मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार उडाला. काही नागरिकांनी भराव टाकल्यामुळे ,अरुंद पुलामुळे, नाल्यांवरील अतिक्रमणे यामुळे शहरात अनेक भागांमध्ये घरात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. काहींनी अग्निशमन विभागाला मदतीसाठी फोन केले.
रात्री पावनेतीनच्या सुमारास अग्निशमन विभागाने काम सुरू केले असून आज सायंकाळ पर्यंत शहरातील संपूर्ण कामे होतील असे अग्निशमन विभागातर्फे सांगण्यात आले. यामध्ये शहरातील सेंट्रल नाका येथील मनपा क्वार्टर्स, इम्तियाज जलील यांच्या घराशेजारील विद्यालंकार शाळा, एन-9 कृष्ण नगर, आरेफ कॉलनी, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बुढीलेन,सिटी चौक, फाजलपुरा,नागेश्वरवाडी, काला दरवाजा कब्रस्तान, जय भवानी नगर, बंजारा कॉलनी, सारा सिद्धी सोसायटी बीड बायपास,चौधरी इस्टेट,मयूर पार्क दत्त कॉलनी, धावनी मोहल्ला,आंबेडकर नगर या भागांमध्ये विविध सोसायटी, घरे, शाळांमध्ये पाणी शिरले होते.यातील काही भागातील कामे पूर्ण झाले असून अजूनही अनेक भागातील कामे पेडिंग आहेत.
नाल्यांची साफसफाई खरोखर झाली का?
अतिक्रमणे, नाल्यांची झालेली अपुरी साफसफाई,लहान लहान गल्ल्या, जवळ जवळ असलेली घरे यामुळे मोठा पाऊस होताच अनेक गल्ल्यांमध्ये पाणी तुंबून ते घरात शिरते. त्यामुळे जीवनावश्यक साहित्य वाचविण्यासाठी नागरिकांना तारांबळ करावी लागते.